पोस्ट्स

SBI bank viral video लेबलसह पोस्ट दाखवत आहे

"हा इंडिया आहे" की "हे कर्नाटक आहे"? – बेंगळुरूतील भाषिक वाद आणि भारतीय भाषिक अस्मिता

इमेज
       एका बँकेतील सामान्य संवादाने संपूर्ण देशात भाषिक अस्मितेचा वाद पुन्हा उफाळून आला आहे . बेंगळुरूच्या सूर्यनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेतील एका ग्राहकाने बँक व्यवस्थापक महिलेला कन्नड भाषेत संवाद साधण्याची विनंती केली , आणि त्या महिलेने उत्तर दिलं – " हा इंडिया आहे , मी हिंदीतच बोलेन !"      ही प्रतिक्रिया केवळ एका बँक कर्मचाऱ्याची नसून , भारतात वारंवार दिसणाऱ्या ‘ हिंदी वर्चस्ववादाचा ’ प्रतिनिधित्व करणारी आहे . आणि म्हणूनच हा मुद्दा केवळ भाषेचा नसून , तो राजकीय , सामाजिक आणि अस्मितात्मक दृष्टिकोनातून चिंतनाचा विषय आहे . भारत – भाषांचा महासागर , एकतेची खरी ओळख      भारत हा देश भाषिक विविधतेचा आदर्श आहे . संविधानात २२ अधिकृत भाषा आणि १९७ मान्यताप्राप्त मातृभाषा आहेत . हिंदी ही अधिकृत भाषा असली तरी ती " राष्ट्रभाषा " नाही .  कर्नाटकासाठी जशी कन्नड भाषा , महाराष्ट्रासाठी मराठी , आणि तामिळनाडूसाठी तामिळ ही भाषा ...