यशोगाथा (Success Story) - माधुरी खेडेकर (राज्य कर निरीक्षक/ STI)
माधुरी खेडेकर
“मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है। बंजर जमीन में पलकर, मैंने मृत्यु से जीवन खींचा है।”
![]() |
"ती एक सामान्य मुलगी होती… पण तिच्या संघर्षांनी तिला असामान्य बनवलं!"
आज ज्या व्यक्तीच्या अनुभवाची
गोष्ट तुम्ही वाचणार आहात, ती केवळ प्रेरणादायक
नाही, तर आत्मचिंतन करायला
लावणारी आहे. आयुष्यातल्या कठीण
काळात, जेव्हा बहुतेकजण परिस्थितीसमोर हार मानतात, तेव्हा
हिने मात्र त्या कठीण प्रसंगांना
स्वतःचं इंधन बनवलं.
ती म्हणते –
“मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है। बंजर जमीन में पलकर, मैंने मृत्यु से जीवन खींचा है।”
शून्यातून
सुरुवात करून, अनेक अडथळे पार
करत, स्पर्धा परीक्षांच्या वाटेवर चालत, तिने स्वतःचा मार्ग
स्वतःच शोधला.
आज ती तिचा प्रवास
शेअर करते आहे – जसा
तो आहे, तितकाच खरा,
नाटकीपणा न करता.
ह्या कथेमध्ये आहे – असमर्थतेतून निर्माण झालेली शक्ती, निराशेतून उगवलेली आशा, आणि एक
स्वप्न — "अधिकारी होण्याचं!"
ही तिची गोष्ट, पण प्रत्येकासाठी एक आरसा ठरू शकते.
ती सांगते की, नशीबामुळे असो वा परिस्थितीमुळे, काही वेळा आपण अशा गोष्टींमध्ये अडकतो, ज्या परिस्थितीतून बाहेर पडणं खूप कठीण होऊन बसतं. पण तिने स्वतःचं रॉकेल स्वतःवर ओतावं लागलं — म्हणजेच ती परिस्थिती उलटवण्यासाठी स्वतःहून कृती करावी लागली.
तिच्या काही मित्रांनी तिला स्पर्धा परीक्षांबद्दल सांगितलं. कदाचित कोणाला वाटेल की "त्याआधी तुला हे माहीत नव्हतं का?" तर नाही — कारण अनेक वेळा आपल्याला स्वतःच शोध घ्यावा लागतो. ती म्हणते, "मी इतकं सगळं पार करून इथपर्यंत आले आहे, याचा अर्थ मी 100 टक्के अधिकारी व्हायचं ठरवूनच हे पाऊल उचललं आहे."
तिच्या
मनात नेहमी गूंजणाऱ्या दोन ओळी —
"मैं
उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है,
बंजर ज़मीन से निकल कर, मैंने मृत्यु से जीवन खींचा है।"
या ओळी तिला सतत प्रेरणा देतात, आणि म्हणूनच ती म्हणते की, आज तिची ही छोटीशी गोष्ट ती सर्वांसाठी घेऊन आली आहे.
माधुरी
खेडकर यांचं आयुष्य जिथून सुरू झालं, ते
म्हणजे मुंबईतील कांदिवली येथील एका चाळीतलं लहानसं
घर. त्यांचं संपूर्ण बालपण तिथेच गेलं. ज्या वेळपासून त्यांना
गोष्टी कळू लागल्या, तेव्हापासून
त्यांनी पाहिलं की त्यांची आई
स्वयंपाकाचं काम करत होती,
तर वडील एका साहेबांच्या
गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होते.
त्यांच्या
इथवर येण्यामागे एक छोटीशी गोष्ट
आहे. त्यांचा मूळ गाव कोकणातील
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हा आहे.
जेव्हा त्यांना गोष्टी समजायला लागल्या, तेव्हा घरचं सगळं सुरळीत
सुरू होतं. वडिलांचा एक चांगला व्यवसायही
चालू होता. पण अचानक काही
तरी घडलं आणि सगळं
मागे टाकून त्यांना मुंबईत यावं लागलं.
आणि
मग मुंबईत जगण्यासाठी सुरू झालेली स्पर्धा
– ती खरी शर्यत होती.
ही शर्यत फक्त त्यांचीच नव्हे,
तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची होती. आयुष्याचा संघर्षांचा प्रवास इथूनच सुरू झाला. त्या
प्रवासाची सुरुवात खूप साध्या पण
भावनिक क्षणातून झाली. त्यांच्या कानात सोन्याची एक छोटीशी रिंग
होती – तीच विकावी लागली.
त्या रिंगमधून मिळालेले 600 रुपये हेच त्यांच्या सुरुवातीचे
हातात आलेले पहिले आधार होते.
आर्थिक परिस्थिती इतकी खालावली होती की ती मोठं कॉलेजही करू शकली नाही. तिचं शिक्षण फक्त अकरावी-बारावीपर्यंतच सीमित राहिलं. ज्या काळात इतर मुले बारावी नंतर इंजिनीअरिंगचं, मेडिकलचं स्वप्न पाहत होती, त्या वेळी ती मात्र हतबल होती – काहीच करू शकत नव्हती.
तिनं
अनेक वेळा आपल्या आईला
विनवणी केली होती – “आई,
मला मेडिकलला जायचं आहे. मला डॉक्टर
व्हायचं आहे. तू काही
तरी मार्ग काढ. कर्ज काढ,
मदत माग… पण मला
डॉक्टर बनव. मी नक्की
करू शकते.”
कारण तिच्या मनाच्या खोल कुठल्या तरी कोपऱ्यात एक विश्वास होता – की इतर मुलं जसं करू शकतात, तसंच तीही करू शकते.
पण त्या वेळी आईचं उत्तर नेहमीसारखंच ठरत होतं – एकच वाक्य, जे ती आजही विसरू शकलेली नाही. आई म्हणायची, “नाही दीदी, तुला शिकवणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. आपल्याकडे इतके पैसे नाहीत. आणि जर तुला शिकवलं, तर तुझ्या लहान भावंडांनाही शिकवावं लागेल.”
आणि म्हणूनच तिथून तिच्या मनात एक वेदना खोल रुजली होती. जे स्वप्न कधी काळी तिच्या डोळ्यांत लखलखत होतं, ते हळूहळू मावळायला लागलं. पण त्याच दरम्यान, डी.एड.चे फॉर्म्स आले आणि एक आशेचा किरण पुन्हा दिसला.
सरकारी कॉलेजमध्ये तिचा डी.एड.साठी प्रवेश झाला आणि तिथून तिच्या शिक्षकी प्रवासाची सुरुवात झाली. २०१० साली तिने डी.एड. पूर्ण केलं.
पण शिक्षण घेताना मनात कायम एकच
विचार असायचा – "बाकीची मुलं कुठल्या कुठे
पोहोचली... कुणी इंजिनिअर, कुणी
डॉक्टर, कुणी परदेशात... आणि
आपण अजून इथेच."
ती तुलना मनाला पोखरत राहायची. पण परिस्थिती इतकी कठीण होती, की जेवढं जमेल, तेवढंच शिक्षण घेऊन तिने आपला प्रवास सुरू ठेवला.
२०१० मध्ये तिच्या हातात फक्त बारावी आणि डी.एड.ची पदवी होती... पण त्यामागे झगडण्याची, त्यागाची, आणि संघर्षाची एक खूप मोठी कहाणी लपलेली होती.
२०१० ते २०२० या दशकभराच्या काळात आयुष्याने तिला केवळ शिकवलं नाही, तर खोलवर अनुभव दिले. हे अनुभव इतके कठोर आणि वेदनादायक होते की, कधी कधी तिला वाटायचं की आयुष्यच नकोसं झालंय.
"आपण काहीच करू शकत नाही" – हा विचार मनात वारंवार येऊ लागला होता. आयुष्य इतकं अंधारमय वाटू लागलं की मरण हाच एकमेव पर्याय उरला आहे, असं ती स्वतःशीच म्हणू लागली होती.
ती त्या टोकाच्या वाटेवरूनही फिरून आली होती.
पण हा अंधार २०२० पासून हळूहळू विरायला लागला. आणि २०२१ मध्ये, तिचं आयुष्य संपूर्णपणे पालटून गेलं.
आज ती ज्या ठिकाणी उभी आहे, ते पाहता तिचा संपूर्ण प्रवासच एक प्रेरणादायी उदाहरण वाटतो – कारण एका काळी जिथे फक्त निराशा होती, तिथे आता आशेचा उजेड पसरलेला आहे.
२०२० पर्यंतचा संपूर्ण एक दशक – हा काळ तिला आयुष्याच्या सर्वांत कठीण वळणांवर घेऊन गेला होता. त्या दहा वर्षांत इतकं काही घडलं, इतके वाईट प्रसंग आले, की शेवटी एक गोष्ट ती शिकली – "आपली किंमत ही आपल्यालाच निर्माण करावी लागते."
कोणी दुसरं आपल्या किमतीचं मोजमाप करू शकत नाही. ही जाणीव तीच्या मनात कोरली गेली, तेव्हाही तीचं शिक्षण पूर्ण झालं नव्हतं. केवळ बारावीपर्यंत शिक्षण झालेलं होतं, आणि आयुष्य पुढे नेण्याचा मार्ग तिला दिसत नव्हता.
तीनं अनेक वेळा शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण आयुष्यात असे प्रसंग, अशा अडचणी आल्या, की काहीही सुचेनासं झालं. परिस्थितीने इतकं घेरून टाकलं होतं की तिच्या मनात एकच विचार सतत घोळत राहायचा — "आता आयुष्य संपवावं."
ती मृत्यूच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली होती. पण त्या क्षणी, तिच्यातील जिद्दीने निर्णय घेतला — मरण नाही, जीवन हवं आहे.
मग त्या जगलेल्या क्षणांनी, त्या काळोख्या अनुभवांनीच तिला इतकी जबरदस्त प्रेरणा दिली की आज ती ठामपणे म्हणते: "या आयुष्यात जेवढा वेळ उरलेला आहे — ३० वर्ष, ४० वर्ष, किंवा शेवटचा श्वास जाईपर्यंत — हेच आयुष्य मला सतत प्रेरणा देणार आहे. कारण जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या सीमारेषेवरून परत येते, तेव्हा तिचं जीवन केवळ जगणं राहत नाही — ते एक प्रेरणादायी कथा बनतं.
आपल्या आजूबाजूचे लोक असोत, की मग आपलं नशीब असो किंवा परिस्थिती—आपण काही अशा गोष्टींमध्ये अडकतो, जिथून बाहेर पडणं आपल्यासाठी जवळपास अशक्यच वाटतं. अशाच काही प्रसंग माझ्या आयुष्यात त्या काळात घडले. त्या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला मोकळं करण्यासाठी जी धडपड होती, ती खूपच लांब चालली—अगदी सात, आठ, नव वर्षं लागली असे ती सांगते.
ती पुढे सांगते कि, या काळात आयुष्याने मला अतिशय कठीण प्रसंग दिले. इतके कठीण, की खरंच वाटायचं, "जगावं की मरावं?" असा एकच प्रश्न समोर राहायचा. आणि उत्तर मात्र केवळ एकच दिसायचं—"आपण मेलंच पाहिजे." कारण त्या अवस्थेत जगून काहीही शक्य होईल, असं मला कधीच वाटलं नाही.
आणि त्याच वेळेस, एकदा तिच्या नजरेस फिनाइल पडलं. ते पाहून काय करावं, हेच तिला कळेना. ती खरंच त्या टोकाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर जाऊन पोचली होती… पण कशीबशी वाचली. घरच्यांनी वेळेत लक्ष दिलं आणि तिचे प्राण वाचले. मात्र त्यानंतरही असे प्रसंग वारंवार घडत राहिले. एकदा तर परिस्थिती इतकी असह्य झाली की तिला रॉकेल स्वतःवर ओतावं लागलं. हो, इतकं भयानक होतं तिचं सगळं आयुष्य त्या काळात. हे प्रसंग तिच्या आयुष्यातले सर्वात काळोखे क्षण होते. पण त्या अनुभवांनंतर तिनं मनाशी एक निश्चय केला — जोपर्यंत ती या सगळ्या अडचणींमधून बाहेर पडत नाही, जोपर्यंत तिला स्वतःच्या आयुष्याचा खरा अधिकार आहे हे स्वतःलाच पटत नाही, तोपर्यंत ती स्वतःसाठी काहीच करू शकणार नाही. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होणं, हाच तिच्या नव्या आयुष्याचा खराखुरा आरंभ ठरला.
इतकं सगळं घडत असताना ती काय करत होती? तर तिचे वडील 2010 मध्ये निधन पावले. त्या आधीपासूनच ती अनेक शाळांमध्ये एक प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करत होती. शिक्षक म्हणून काम करत असतानाच ती घरी ट्युशन घेण्याचंही काम करत होती — अगदी दहावीत असतानापासूनच.
तिच्या वडिलांच्या मृत्यूपूर्वीपासूनच ती काम करत होती. अगदी मुंबईत राहणाऱ्या लोकांना माहिती असलेली इमिटेशन ज्वेलरी असते, त्या ज्वेलरी बनवण्याचं कामसुद्धा तिनं केलं. शिवाय टेलिकॉलिंगपासून ते कॉल सेंटरमध्ये काम करणं, मुलांच्या घरी जाऊन त्यांना शिकवणं, शाळांमध्ये शिकवणं, कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणं — अशा अनेक प्रकारची कामं तिनं केली.
प्रत्येक
ठिकाणी तिची एकच धडपड
सुरू होती — कसं जीवन जगता
येईल? कसं पैसे मिळवता
येतील? कारण घरातली परिस्थिती
अशी होती की काहीतरी
करावंच लागणार होतं. आणि सतत एकच
विचार तिच्या डोळ्यांसमोर होता — हे आयुष्य कसं
बदलता येईल? आपण काय करू
शकतो? याच ध्यासाने ती
झपाटलेली होती.
ती सांगते…
"आता तुम्ही विचाराल, या दहा वर्षांमध्ये नेमकं काय घडलं? तर काही गोष्टी अशा असतात, ज्या आपल्या आयुष्यात पूर्वी घडलेल्या असल्या तरी त्या तशाच मागे राहिलेल्या चांगल्या असतात. कारण त्या जर पुन्हा वर्तमानात आणल्या, तर कदाचित आपलं भविष्यातील आयुष्य बिघडू शकतं. म्हणूनच भूतकाळातील अनेक गोष्टी भूतकाळातच राहणं योग्य असतं.
त्या अनुभवांमधून तिला जगण्याची प्रेरणा मिळाली. ती म्हणते, ‘माझा भूतकाळ मला आज फक्त शिकवतो – त्या प्रत्येक प्रसंगातून मी केवळ प्रेरणा घेतली. मला हे उमगलं, की मी नक्कीच काहीतरी आयुष्यात करू शकते. म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी मी आता माझा "सोबती" म्हणून ठेवलेल्या आहेत – मागे न टाकता, पण नव्याने न उकरता, फक्त प्रेरणा म्हणून.’ज्यावेळेस तिच्या आयुष्यात स्पर्धा परीक्षांचा विचार आला, तो काळ होता 2019 च्या शेवटचा. काही मित्रांकडूनच तिला समजलं की "स्पर्धा परीक्षा" नावाचं एक क्षेत्र आहे. काहींना हे आश्चर्य वाटेल की तिला त्यापर्यंत याबाबत माहिती नव्हती का? पण हो, खरंच तिच्या माहितीत हे नव्हतं.
"ग्रॅज्युएशन पूर्ण झालं नव्हतं, म्हणून तिनं विचार केला की ओपन युनिव्हर्सिटीमधून अॅडमिशन घ्यावं. 2018 मध्ये ती फर्स्ट इयरला दाखल झाली, त्यानंतर 2019–20 असा प्रवास करत अखेर 2020 मध्ये—जेव्हा कोरोनाचा काळ सुरू होता—तेव्हा तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. 2019 मध्येच तिनं ठरवलं होतं की आता इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेकडे लक्ष द्यायचं. ती स्पर्धा परीक्षा द्यायच्या तयारीला लागली होती.
तिला माहिती होतं की स्पर्धा परीक्षा द्यायची असेल, तर पुण्यात जावं लागतं—स्वप्नांचं शहर म्हणतात ना!
खरं
तर बरेच जण मुंबईला
'स्वप्नांचं शहर' म्हणतात, पण
स्पर्धा परीक्षांचं खरं स्वप्नांचं शहर
कोणतं असेल, तर ते फक्त
पुणेच असू शकतं आणि
अभ्यास करायचा असेल, तर पुण्यात आल्याशिवाय
तो पूर्ण होत नाही, असं
तिला वाटत होतं."
"पुण्यात राहावं लागेल, क्लासेस करावे लागतील, अभ्यास करून परीक्षा पास व्हावी लागेल आणि मग कुठे अधिकारी होता येईल—इतपतच तिला माहीत होतं. पण प्रत्यक्ष पुण्यात जायचं कसं? हाच सर्वात मोठा प्रश्न होता.
घरून कोणतंहीआर्थिक पाठबळ मिळणार नव्हतं. कुणीही पैसे देणार नव्हतं. मग अभ्यास करायचा कसा? जर पूर्णवेळ अभ्यास करायचा असेल, तर किमान उदरनिर्वाहासाठी कुठून तरी पैसे यायला हवे होते.
त्यामुळे तिनं ठरवलं—काही महिन्यांच्या कालावधीत थोडेफार पैसे साठवावे. दोन–चार महिन्यांच्या अथक प्रयत्नातून तिनं थोडीशी रक्कम जमा केली आणि अखेर निर्णय घेतला—'आता पुण्याला जायलाच हवं!' आणि जे थोडेफार पैसे तिनं साठवले होते, ते घेऊनच ती पुण्याला पोहोचली."
"ती पुण्यात आली आणि अगदी जसंच आपण म्हणतो, ‘तुझं नशिबच असं होतं’, तसंच काहीसं घडलं. येताच तिच्या गुडघ्याला त्रास सुरू झाला. गुडघ्यात रक्ताच्या गाठी तयार झाल्या आणि त्यामुळे तीव्र वेदना होऊ लागल्या. इतक्या की, लायब्ररीमध्ये अभ्यास करतानासुद्धा ती वेदना असह्य व्हायची.
डॉक्टरांनी सांगितलं की, शस्त्रक्रिया तातडीची आहे—ती झाली नाही तर पुढचं काहीही शक्य होणार नाही. त्या परिस्थितीत अभ्यास, चालणं, किंवा जगण्याचा दैनंदिन क्रमही अवघड होणार होता. जी रक्कम तिनं पुण्यात राहत अभ्यास करण्यासाठी जपून आणली होती, ती पुढील पाच–सहा महिन्यांसाठी पुरेशी होती. पण सगळी रक्कम तिला त्या शस्त्रक्रियेसाठी खर्च करावी लागली. तिचं संपूर्ण आर्थिक नियोजन त्या एकाच संकटात कोसळलं."
"शस्त्रक्रियेसाठी ती मुंबईला, आपल्या आईकडे गेली होती. गुडघ्याचे ऑपरेशन पार पडले. पण तिच्या मनात एक गोष्ट ठाम होती—स्वप्न अर्धवट ठेवायचं नाही. त्यामुळे पुन्हा पुण्यात परत कसं जाता येईल, याचा विचार तिने सुरू केला. त्यानुसार तिनं विविध वेबसाइट्सवर शोध घेणं सुरू केलं. अभ्यासाबरोबरच काही काम करता येईल का, याचा विचार करत ती ट्यूशन देण्याच्या संधी शोधू लागली. काही वेबसाइट्सवर तिला अशी ठिकाणं सापडली, जिथे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिकवण्याची संधी होती.
मुंबईत असतानाच तिनं पुण्यातील एक ट्यूशन जॉब निश्चित केला. आणि मग, पुन्हा एकदा ती पुण्यात परतली—स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धारासह."
"जेव्हा इतर सर्व विद्यार्थी दिवसभर लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असायचे, तेव्हा संध्याकाळी पाच-सहा वाजले की तिला क्लासला जायचं असायचं. अशा वेळी तिच्या मनात तीव्र खंत निर्माण व्हायची — 'का? का आपल्यालाच हे करावं लागतंय? का मी इतरांप्रमाणे दिवसभर अभ्यास करू शकत नाही?' ही खंत तिच्या मनात नेहमीच असायची.
तरीही ती चालत राहिली. अभ्यास सुरू ठेवला. आणि 2020 साली झालेली पहिलीच संयुक्त पूर्व परीक्षा तिने दिली. पहिल्याच प्रयत्नात ती पास झाली. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरली. आणि तिथून तिच्या अभ्यासाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने वेग आला."
जर एखादी व्यक्ती लगेच पहिल्याच प्रयत्नामध्ये पास होते, तर ती नक्कीच काहीतरी पुढे, आणखी चांगल्या पोस्टपर्यंत पोहोचू शकते. ती नक्कीच अधिकारी होऊ शकते. हे स्वप्न जे आईचं होतं, ते खूप जास्त जीवंत झालं आणि तिच्या खूप जवळ आलं होतं — की आपण नक्कीच चित्तपर्यंत पोहोचू शकतो. हा विश्वास तिच्यात प्रचंड प्रमाणात निर्माण झाला.
दुसरी
गोष्ट म्हणजे, ज्या वेळेस तिने
स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात आली आणि अभ्यास
सुरू केला, त्यावेळी तिच्यात इतरांपेक्षा एक गोष्ट वेगळी
होती — की तिने स्वतःची
तुलना कधीच इतर विद्यार्थ्यांशी
केली नाही. तिच्या आजूबाजूला असे अनेक विद्यार्थी
होते, जे पाच वर्ष,
दहा वर्ष, चार वर्ष, तीन
वर्ष अभ्यास करत होते. तिच्यापुढे
अनेक जण विविध क्लासेस
करत होते. तरीही तिने स्वतःला कधीच
कमी समजलं नाही. "मी नक्कीच करेन,"
हा प्रचंड आत्मविश्वास तिच्यामध्ये होता. ती सांगते तो
ओव्हरकॉन्फिडन्स नव्हता, पण अत्यंत ठाम
असा आत्मविश्वास होता.
तिला माहिती होतं की जर ती इथेपर्यंत आली आहे, इतकं सगळं पार करून जर ती इथवर पोहोचली आहे, तर ती नक्कीच शंभर टक्के अधिकारी व्हायला योग्यच आहे. एवढा प्रचंड आत्मविश्वास तिने स्वतःवर ठेवलेला होता. आणि याच आत्मविश्वासामुळे ती पहिल्याच प्रयत्नात पूर्वपरीक्षा पास झाली, मुख्य परीक्षा पास झाली.
त्यानंतर जेवढ्या स्पर्धा परीक्षा आल्या, त्या सर्व परीक्षा ती देत गेली आणि सर्व परीक्षा पास होत गेली. 2020 ची पूर्वपरीक्षा झाली, ती पास झाली. त्यानंतर 2021 ची पूर्व परीक्षा झाली, तीही पास झाली. पुढे 2021 ची गट-क ची परीक्षा झाली, तिचाही पूर्व टप्पा तिने पार केला.
या सगळ्यानंतर, 2021 च्या राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेमधून तिला STI ही पोस्ट मिळाली. आणि STI या पदावर तिची निवड झाली. आज ती सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून, गट-ब अधिकारी म्हणून सर्वांसमोर उभी आहे. त्यानंतर तिने राज्यसेवेची परीक्षा दिली होती. मात्र त्या राज्यसेवेचा जो निकाल होता, त्या निकालामध्ये — म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये — ती केवळ 0.50 गुणांनी नापास झाली होती.
या अपयशामुळे ती काही क्षणांसाठी पूर्णपणे मानसिक तणावात गेली होती. इतकं की, STI झाल्यानंतरसुद्धा तिला असं वाटलं की आता काहीच शक्य नाही, काहीच करता येणार नाही, अभ्यासही थांबला आहे, आणि पुढे काय करायचं — हा मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला.पण कदाचित दुसऱ्या दिवसाचा जो क्षण होता, तो तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घेऊन येणार होता.
दुसऱ्याच
दिवशी तिने एक महत्त्वाचा
विचार केला होता — जर
आपण सध्या स्वतः अभ्यास करू शकत नाही,
तरी आपल्याला जे येतं, जे
समजतं, ते इतरांना नक्की
शिकवू शकतो. आपले ज्ञान इतरांपर्यंत
पोहोचवता येऊ शकते.
त्या
अॅपवरूनच तिने आपला ऑनलाइन
प्रोग्राम सुरू केला. जिथे
केवळ 30–40 विद्यार्थ्यांची अपेक्षा होती, तिथे तब्बल 100, 200, अगदी
300 विद्यार्थी तिच्यापर्यंत पोहोचले.
जो प्रवास तिचा अगदी 600 रुपयांपासून सुरू झाला होता, तो कधी 6000 वर आला, नंतर STI म्हणून तो 60,000 वर पोहोचला, आणि आज तो 1,00,000 आणि त्याही पुढे नेलेला आहे. आणि हे सगळं केवळ तिच्या स्वतःवर असलेल्या प्रचंड आत्मविश्वासामुळे शक्य झालं.
ती सांगते, “मित्रांनो, एक गोष्ट मला तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल – तुम्ही जिथे आहात, आयुष्याच्या कोणत्याही वळणावर असलात तरी, तुमचं वय कितीही असो, तुम्ही जिथे आहात तिथून तुमचं संपूर्ण विश्व – म्हणजेच तुमचं साम्राज्य – निर्माण करू शकता.”
तिच्या मते, त्यासाठी फक्त एका गोष्टीची गरज आहे – स्वतःवर असलेला प्रचंड आत्मविश्वास. आणि हा आत्मविश्वास माणसाला नक्कीच आयुष्यात पुढे घेऊन जातो.
ती हे ठामपणे म्हणते
– “जर मी करू शकते,
तर तुम्ही नक्कीच करू शकता.”
ती सांगते, “माझा जो हा प्रवास आहे, त्याबद्दल बोलायला मला आज इथे आमंत्रित केल्याबद्दल मी ‘स्टॉक ने’ अत्यंत ऋणी आहे. त्यांच्या माध्यमातून मला माझी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवता आली, यासाठी मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानते.”
त्या प्रवासाचा सार व्यक्त करत, तिने तिच्या सुरुवातीच्या दोन ओळी शेअर केल्या – ज्या तिच्या संपूर्ण वाटचालीचं प्रतिबिंब वाटतात:
"मैं
उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है,
बंजर
ज़मीन में पलकर मैंने
मृत्यु से जीवन खींचा
है,
पत्थर पर लिखी इबारत हूं मैं, तुम शीशे से कब तक मुझे तोड़ोगे,
मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझे कब तक रोकोगे।"

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा