Daily Current Affairs 8 January 2026 - चालू घडामोडी
दैनिक चालू घडामोडी – ८ जानेवारी २०२६ | Daily Current Affairs 8 January 2026 ८ जानेवारी २०२६ रोजीच्या दैनिक चालू घडामोडींमध्ये भारतीय लष्कराची नवी Bhairav Special Force (ड्रोन युद्धासाठी), भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश, प्रसार भारतीमार्फत मणिपूरमध्ये Thadou भाषेचे रेडिओ प्रसारण पुनर्संचयित करण्याची पावले, तेजस हलक्या लढाऊ विमानाच्या पहिल्या उड्डाणाची २५ वी वर्षपूर्ती, तसेच पाकिस्तानातील Taxila (रावळपिंडी) येथे सापडलेली कुशाण सम्राट वसुदेवाच्या काळातील २,००० वर्षे जुनी नाणी व lapis lazuli यांचा समावेश आहे. ही सर्व माहिती MPSC/UPSC, संरक्षण, कृषी, संस्कृती, प्राचीन इतिहास आणि विज्ञान-तंत्रज्ञान या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. 1. भारतीय लष्कराची ‘Bhairav’ विशेष दल – ड्रोन युद्धासाठी नवी फोर्स | Indian Army’s Bhairav Force for Drone Warfare सारांश: भारतीय लष्कराने आधुनिक आणि hybrid warfare लक्षात घेऊन ‘Bhairav’ नावाची नव्या पिढीची तंत्रज्ञान-आधारित विशेष फोर्स उभारली आहे. या फोर्ससह संपूर्ण सेनेमध्ये एक लाखाहून अधिक ड्रोन ऑपरे...