जी एस टी परिषदेच्या ५० व्या बैठकीतील निर्णय
ऑनलाईन गेमिंगवर टॅक्स
- ऑनलाईन गेमिंग (Online Gaming), हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28 टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कार खरेदी करणं महागणार
- ज्या कारची लांबी 4 मीटरपेक्षा अधिक आहे, इंजिन क्षमता 1500 सीसीपेक्षा अधिक आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 एमएमपेक्षा अधिक आहे, अशा कार्सवर 22 टक्के कंपनसेशन सेस (Compensation Cess) लागू होणार आहे.
- यामधून सेडान कार्सना वगळण्यात आले आहे.
आयात केलेलं कर्करोगाचे औषध स्वस्त
- आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर IGST लावला जाणार नाही. म्हणजेच, हे औषध स्वस्त होणार आहे.
- कॅन्सरवरील औषध Dinutuximab ची आयात स्वस्त होईल.
- सध्या यावर 12 टक्के IGST आकारला जातो, जो परिषदेनं शून्यावर आणला आहे.
- या औषधाच्या एका डोसची किंमत 63 लाख रुपये आहे.
चित्रपट गृहांमध्ये जेवण स्वस्त
- सिनेमागृहांमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थ आणि शीतपेयेवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावाला परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
खालील खाद्यपदार्थ स्वस्त
- न शिजवलेल्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच, आता कच्च्या किंवा न तळलेल्या गोष्टी स्वस्त झाल्या आहेत.
याशिवाय इमिटेशन, जरीच्या धाग्यावरील कर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा