पोस्ट्स

general knowledge लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नागरिकत्व कायदा - १९५५

इमेज
नागरिकत्व कायदा १९५५ या कायद्यात नागरिकत्व संपादन करण्यासंदर्भात आणि रद्द करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात नागरिकत्व मिळवण्याचे १) जन्म, २) वंश, ३)नोंदणी, ४) भूप्रदेशाचा समावेशव ५ ) नैसर्गिकीकरण हे पाच मार्ग सांगण्यात आले आहेत. १) जन्म  ● २६ जानेवारी १९५० रोजी किंवा त्यानंतर मात्र ११ जुलै १९८७ पूर्वी भारतात जन्मलेली व्यक्ती; मग तिचे पालक कोणत्याही देशाचे नागरिक असले तरी ती भारतीय नागरिक मानली जाते.  ●१ जुलै १९८७ रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक समजले जाते. मात्र, अशा व्यक्तीच्या जन्माच्या वेळी तिच्या पालकांपैकी कोणीही एक जण भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.  ●३ डिसेंबर २००४ रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेली व्यक्ती; जिच्या पालकांपैकी कोणीही एक भारतीय नागरिक असेल किंवा भारतात कायदेशीर वास्तव्य करीत असेल, ती भारतीय नागरिक मानली जाते.  ●महत्त्वाची बाब म्हणजे भारतात कार्यरत परदेशी राजदूत आणि शत्रू राष्ट्राचे नागरिक यांच्यापैकी कोणाच्याही मुलांचा जन्म भारतात झाला असला तरीही त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकत नाही. २) वंश ●२६...

जी एस टी परिषदेच्या ५० व्या बैठकीतील निर्णय

इमेज
ऑनलाईन गेमिंगवर टॅक्स   ऑनलाईन गेमिंग (Online Gaming), हॉर्स रेसिंग, कॅसिनोच्या संपूर्ण किमतींवर 28 टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कार खरेदी करणं महागणार  ज्या कारची लांबी 4 मीटरपेक्षा अधिक आहे, इंजिन क्षमता 1500 सीसीपेक्षा अधिक आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 एमएमपेक्षा अधिक आहे, अशा कार्सवर 22 टक्के कंपनसेशन सेस (Compensation Cess) लागू होणार आहे. यामधून सेडान कार्सना वगळण्यात आले आहे.  आयात केलेलं कर्करोगाचे औषध स्वस्त  आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर IGST लावला जाणार नाही. म्हणजेच, हे औषध स्वस्त होणार आहे. कॅन्सरवरील औषध Dinutuximab ची आयात स्वस्त होईल. सध्या यावर 12 टक्के IGST आकारला जातो, जो परिषदेनं शून्यावर आणला आहे. या औषधाच्या एका डोसची किंमत 63 लाख रुपये आहे. चित्रपट गृहांमध्ये जेवण स्वस्त सिनेमागृहांमध्ये उपलब्ध खाद्यपदार्थ आणि शीतपेयेवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावाला परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. खालील खाद्यपदार्थ स्वस्त  न शिजवलेल्या वस्तूंवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आ...

चालू घडामोडी १३ जुलै २०२३

इमेज
  लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ : २०२३ चा ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार. नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेसाठी हा पुरस्कार देण्यात येणार. १२ मे २०२० रोजी नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे अभियान सुरू केले. युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पयनशिप २०२३ : लेमरिक, आयर्लंड येथे खेळवली जातं आहे. भारताने ११ पदके जिंकली आहेत. ६ सुवर्ण, १ रौप्य, ४ कास्य. रीकर्व प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पार्थ साळुंखे पहिला भारतीय. नाटो शिखर परिषद २०२३ : NATO - नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गायझेशन. स्थापना - ४ एप्रिल १९४९ मुख्यालय - ब्रुसेल्स, बेल्जियम Sarchitnis- जेम्स स्टॉल्टनबर्ग सदस्य - ३१ देश २०२३ ची परिषद लिथुआनिया देशात आयोजित करण्यात आली आहे. पंचेश्र्वर बहुउद्देशीय प्रकल्प : भारत आणि नेपाळमधील लाभदायक प्रकल्प. महाकाली नदीवर हा प्रकल्प आहे. जागतिक लोकसंख्या दिवस : ११ जुलै रोजी साजरा केला जातो. 2023 Theme - Unleashing the power of gendre inequality. २१ वर्षांखालील युरोपियन चॅम्पयनशिप : इंग्लंडने स्पेनला हरवून जिंकली. १९८४ नंतर प्रथमच इंग्...

पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३

इमेज
पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२३ बद्दल माहिती.. १) २०२३ ची पॅरा ॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पार पाडत आहे. २) ही स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची फ्रान्सची ही तिसरी वेळ आहे. ३) यंदाची या स्पर्धेची ही १० वी आवृत्ती आहे. ४) ही स्पर्धा ८ ते १७ जुलै दरम्यान खेलवली जाणार आहे. ५) सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, कोस्टारिका आणि आयव्हरी कोस्ट हे देश पहिल्यांदाच ह्या स्पर्धेत भाग घेत आहेत.