नागरिकत्व कायदा - १९५५



नागरिकत्व कायदा १९५५

या कायद्यात नागरिकत्व संपादन करण्यासंदर्भात आणि रद्द करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यात नागरिकत्व मिळवण्याचे १) जन्म, २) वंश, ३)नोंदणी, ४) भूप्रदेशाचा समावेशव ५ ) नैसर्गिकीकरण हे पाच मार्ग सांगण्यात आले आहेत.

१) जन्म

 ● २६ जानेवारी १९५० रोजी किंवा त्यानंतर मात्र ११ जुलै १९८७ पूर्वी भारतात जन्मलेली व्यक्ती; मग तिचे पालक कोणत्याही देशाचे नागरिक असले तरी ती भारतीय नागरिक मानली जाते.

 ●१ जुलै १९८७ रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक समजले जाते. मात्र, अशा व्यक्तीच्या जन्माच्या वेळी तिच्या पालकांपैकी कोणीही एक जण भारताचा नागरिक असणे बंधनकारक आहे.

 ●३ डिसेंबर २००४ रोजी किंवा त्यानंतर भारतात जन्मलेली व्यक्ती; जिच्या पालकांपैकी कोणीही एक भारतीय नागरिक असेल किंवा भारतात कायदेशीर वास्तव्य करीत असेल, ती भारतीय नागरिक मानली जाते.

 ●महत्त्वाची बाब म्हणजे भारतात कार्यरत परदेशी राजदूत आणि शत्रू राष्ट्राचे नागरिक यांच्यापैकी कोणाच्याही मुलांचा जन्म भारतात झाला असला तरीही त्यांना भारतीय नागरिकत्व मिळू शकत नाही.

२) वंश

●२६ जानेवारी १९५० रोजी किंवा त्यानंतर मात्र, १० डिसेंबर १९९२ पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती वंशानुसार भारताची नागरिक मानली जाऊ शकते; परंतु अशा व्यक्तीच्या जन्माच्या वेळी तिचे वडील भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

●१० डिसेंबर १९९२ रोजी किंवा त्यानंतर भारताबाहेर जन्मलेल्या व्यक्तीला भारताचा नागरिक मानले जाते; जर त्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी तिच्या पालकांपैकी एक जण भारतीय नागरिक असेल.

●३ डिसेंबर २००४ रोजी किंवा त्यानंतर भारताबाहेर जन्माला आलेली व्यक्ती वंशानुसार भारताची नागरिक असू शकत नाही; जोपर्यंत तिच्या जन्मतारखेच्या एका वर्षाच्या आत भारतीय दूतावासात त्या व्यक्तीच्या जन्माची नोंद होत नाही. अशा अल्पवयीन व्यक्तीच्या जन्मनोंदणीच्या वेळी तिच्याकडे कोणत्याही देशाचे नागरिकत्व नाही, याचे लेखी पत्र जोडणे आवश्यक असते.

●एखाद्या व्यक्तीचा किंवा तिच्या पालकांपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात किंवा १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारतात विलीन झालेल्या प्रदेशात झाला असेल, तर ती व्यक्ती वंशानुसार भारतीय नागरिक मानली जाते.

३) नोंदणी पद्धत

पुढीलपैकी कोणत्याही वर्गात मोडणारी कोणतीही व्यक्ती नोंदणी पद्धतीद्वारे भारतीय नागरिकत्वासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करू शकते :

  • नोंदणीपूर्वी सात वर्षे भारतात वास्तव्यास असणारी भारतीय वंशाची व्यक्ती
  • अविभाजित भारताबाहेरील कोणत्याही देशात किंवा ठिकाणी वास्तव्यास असलेली भारतीय वंशाची व्यक्ती
  • भारतीय नागरिकाशी विवाह केलेली आणि नोंदणी अर्ज करण्यापूर्वी सात वर्षे भारतात वास्तव्य केलेली व्यक्ती
  • ती स्वत: किंवा तिच्या पालकांपैकी कोणीही एक जण स्वतंत्र भारताचा नागरिक होते आणि नोंदणी करण्यापूर्वी १२ महिने भारतात वास्तव्य करत होती, अशी सज्ञान व्यक्ती.
  • भारतीय नागरिकांची अल्पवयीन मुले
४) भूप्रदेश

परकीय भूभाग भारतामध्ये विलीन केल्यानंतर त्या प्रदेशातील कोणत्या व्यक्ती भारताचे नागरिक असतील हे ठरवण्याचा अधिकार भारत सरकारला आहे. अशा व्यक्तींना अधिसूचित तारखेपासून भारताचे नागरिक मानले जाते.

५) नैसर्गिकरण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs May 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी