१८५७ पूर्वीचे उठाव - रामोशांचा उठाव
१८५७ रोजी इंग्रजांविषरोधात खूप मोठा उठाव झाला, परंतु त्यापूर्वीही बरेच उठाव झाले ज्यांनी इंग्रज सत्तेला हादरवून सोडले. असे बरेच उठाव भारतात आणि महाराष्ट्रात झाले. हे उठाव इंग्रज सत्तेने राबवलेल्या अन्यायकारक धोरणामुळे असे उठाव केले गेले आणि त्यातून अनेक क्रांतिकारक उदयाला आले. रामोशी, कोळी, भिल्ल, गोंड, संन्यासी, फकीर, व आदीवासी समाजांनी स्वत्व टिकवण्यासाठी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला.
महाराष्ट्रामध्ये रामोशी समाजाने केलेल्या उठावामुळे इंग्रज सत्ताधारी हादरून गेले. रामोशी उठावामध्ये पप्रामुख्याने पुढील क्रांतिकारक होऊन गेले. संतू नाईक, उमाजी नाईक, दौलतराव नाईक, चतुरसिंह नाईक इ.
MPSC च्या इतिहासाच्या अभयसक्रमाला सुरुवात करताना ह्या उठावाचा अभ्यास महत्वाचा ठरतो कारण बरेच प्रश्न या उठावांवर विचारले गेले आहेत.
१८५७ च्या उठावापूर्वी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यात झाला होता. महाराष्ट्रातील संस्थानिकांनी रामोशी, कोळी, भिल्ल यांना उठाव करण्यास प्रोत्साहन दिले होते.
महाराष्ट्रातील रामोशी समाजाचे उठाव
प्रामुख्याने महाराष्ट्रात राहणारे रामोशी (रामवंशी) बांधव 'नाईक' अशी संज्ञा लावत. रामोशी या शब्दाचा अर्थ 'रानवंशी' म्हणजे रानात राहणारे असा सुद्धा घेतला जातो. रामोशी बांधव पशुपालन, किल्ल्यांचा बंदोबस्त, तसेच काही गावांचा महसूल गोळा करणे अशी कामे करत असत. त्यांना वतनी इनामेही देण्यात आली होती. ब्रिटिशांनी रामोशांची वतने काढून घेतली आणि कमावरूनही काढून टाकले. याच असंतोषातून त्यांनी उठाव केला. उमाजी नाईक यांनी रामोशांच्या बंडाचे नेतृत्व केले.
नरवीर उमाजी नाईक यांचा उठाव (Umaji Naik)
उमाजी दादजी नाईक (खोमणे). जन्म : ७ सप्टेंबर १७९१; भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे.
नरवीर उमाजी नाईक पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होते. प्रा. सदाशिव आठवले यांनी उमाजी नाईक यांचे '१६२ सेमी उंचीचा, मोठ्या डोळ्यांचा उमाजी क्रूर नव्हता, त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न होता.' या शब्दांत वर्णन केले आहे.
टीप : वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक गणले जाते. मात्र, फडके यांच्याआधी सुमारे ६० वर्षे नरवीर उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीचे हत्यार उपसले. त्यामुळे उमाजी नाईक यांचा उल्लेखदेखील 'आद्य क्रांतिकारक असा केला जातो.
ब्रिटिशांनी रामोशी वतने रद्द केली आणि त्या रागातून उमाजी नाईक यांनी सहकारीच्या साथीने उठाव करण्यास सुरुवात केली आणि ठिकठकाणी दरोडे घातले.
संतू नाईक यांनी उमाजी नाईक यांच्या अगोदर रामोशी उठावाचे नेतृत्व केले.
१८१८ मध्ये भोर जवळील 'विंग' गावात दरोडा टाकताना ब्रिटिशांनी उमाजींना पकडले.
तुरुंगातच त्यांनी अक्षर ओळख करून घेतली. १८२४ च्या दरम्यान संतू नाईकांच्या नेतृत्वाखाली उमाजी व अमृता नाईक या बंधूंनी भांबुडाचा लष्करी खजिना लुटला.
संतू नाईक यांच्या निधनानंतर उमाजी नाईक हे रामोशींचे नेते बनले. पुढारी बनताच उमाजींनी ७ दरोडे व ८ वाटमाऱ्या केल्या आणि ब्रिटिशांना जेरीस आणले. जेजुरी, सासवड, परिचे, भिवरी, किकवी या भागात त्यांनी प्रचंड लूट केली.
लुटीतील माल त्यांनी गोरगरीबाबांना दान केला. उमाजी स्वतःला ‘राजे' असे म्हणवून घेत असत. १८२६ मध्ये ब्रिटिशांनी पहिला जाहीरनामा काढला. त्यामध्ये उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्यास १०० रुपयांचे बक्षिस जाहीर केले. उमाजींना पकडण्यासाठी घोडदळ तयार केले, चौक्या बसविल्या.
पहिल्या जाहीरनामयने सुद्धा काहीच फरक न पडल्यामुळे इंग्रजांनी दुसरा जाहीरनामा काढला. दुसऱ्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिशांनी दरोडेखोरांना साथ देणाऱ्यांना मृत्यूदंड देण्यात येईल, असे जाहीर केले. त्याचाही काही उपयोग न झाल्यामुळे ब्रिटिशांनी तिसरा जाहीरनामा काढला.
तिसऱ्या जाहीरनाम्यानुसार उमाजींना पकडून देणाऱ्यास १२०० रुपयांचे बक्षिस आणि जो सरकारला मदत करणार नाही त्याला बंडवाल्यांना मिळालेला समजले जाईल असे जाहीर केले. मात्र जनता आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांची उमाजींना साथ होती त्यामुळे इंग्रज सरकारची प्रत्येक हालचाल त्यांना काळात होती.
३० नोव्हेंबर १८२७ रोजी उमाजींनी पुण्याचे कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन यांना काही मागण्या केल्या त्या अशा-
१. रामोशांची परंपरागत वतने परत करावीत.
२. पुरंदर व अन्य ठिकाणच्या रामोशी वतनांना इंग्रजांनी हात लाव नये.
३. अमृता रामोशी व विनोबा यांना सोडण्यात यावे.
हा प्रस्ताव नाकारताना रॉबर्टसन यांनी १५ डिसेंबर १८२७ मध्ये खालील घोषणा केली.-
१. उमाजी, भूजाजी, पांडुजी, येसाजी यांना पकडून देणाऱ्यास प्रत्येकी ५००० रुपये बक्षीस.
२. जनतेने रामोशांना पाठिंबा देऊ नये आणि सहकार्य करू नये.
३. रामोशी ४ परगण्यात जनतेला त्रास देत आहेत त्यांचा कठोर बंदोबस्त करण्यात येईल.
४. बंडखोरांची माहिती देणाऱ्यास खास बक्षीस देण्यात येईल.
परंतु उमाजींवर याचा परिणाम झाला नाही. त्याला उत्तर म्हणू उमाजींनी खालील गोष्टी केल्या.-
१. संतापून पाच इंग्रज अधिकारी पकडून त्यांची मुंडकी छाटून सासवड येथील लष्करी अधिकाऱ्याला पाठवली.
२. २५ डिसेंबर १८२७ रोजी स्वतः जाहीरनामा काढून त्यात ' ठाणे, रत्नागिरीतील पाटील यांनी इंग्रज सरकारला महसूल न देता तो उमाजींना द्यावा तसेच यमजींच्या माणसांना पैसे द्यावेत.'
जाहीरनाम्यामुळे भोर संस्थानातील १३ गावांनी उमाजींना महसूल दिला.
कोल्हापूरचे छत्रपती व आंग्रे यांच्याशी उमाजींनी संधान बांधले.
उमाजींच्या बायको-मुलांना कैद केले. त्यामुळे त्यांनी शरणागती पत्करली. इंग्रजांनी त्यांचे सर्व गुन्हे माफ करून पुणे व सातारा भागात शांतता टिकविण्याची जबाबदारी दिली. मात्र १३ गावांच्या महसूलावरून वाद परत वाद झाला.
खटाव, नातेपुते येथे उमाजींनी बंडाची तयारी केल्याने त्यांना अटक. उमाजींनी तुरुंगातून पळ काढला.
कॅ. अलेक्झांडर व कॅ. मॅकिन्टॉश यांनी उमाजींना पकडण्याची जबाबदारी घेतली, परंतु ते हाती लागले नाहीत. त्यांचा पहिला संघर्ष मांढरदेव डोंगरावर झाला पण ते तेथून निसटले.
त्यानंतर २६ जानेवारी १८३१ मध्ये पुण्याचे जॉर्ज जिबर्न यांनी जाहीरनामा काढला त्यामध्ये-
१. उमाजी व त्यांचे साथीदार गुणाजी, येसाजी, कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास ५००० रु. व २०० बिघा जमीन
२. उमाजींची माहिती देणाऱ्यास २५०० रु. व १०० बिघे जमीन देण्याची घोषणा केली.
३. प्रत्यक्ष बंडात सामील असणाऱ्याने माहिती पुरवल्यास त्याचे सर्व गुन्हे माफ होतील.
यानंतर उमाजींनी खालील गोष्टी केल्या-
१. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, मराठवाडा याठिकाणी दंगे करून इंग्रजांना हैराण केले.
२. त्यांचा उठाव ७ महिने चालू होता तरी त्यांना पकडता आले नाही.
८ ऑगस्ट १८३१ रोजी ब्रिटिशांनी अजून एक जाहीरनामा काढला त्यानुसार खालील घोषणा केल्या -
१. इनाम १०,००० रुपये आणि ४०० बिघा जमीन.
२. बातमी पुरवणाऱ्याला ५,००० रुपये आणि २०० बघा जमीन.
या मोठ्या आमिषास बळी पडून उमाजींचे सहकारी काळू नाईक, नाना चव्हाण आणि बापूसिंग परदेशी यांनी फितुरी केली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी नाना चव्हाण याने उत्रोली (उत्तरोली) येथे उमाजींना पकडून इंग्रजांच्या हवाली केले.
३ फेब्रुवारी १८३२ रोजी नरवीर उमाजी नाईक यांना पुण्यातील खडकमाळ आळी येथे फाशी देण्यात आली.
उमाजींसोबत त्यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनादेखील ब्रिटिशांनी फाशी दिली.
२. दौलतराव नाईक ( Daulatrao Naik)
उठावातील भूमिका:
उमाजी नाईक यांना फाशी दिल्यानंतर रामोशी समाजात निर्माण झालेल्या रिकाम्या नेतृत्वाच्या जागी दौलतराव नाईक यांनी पुढाकार घेतला.
जन्म- कोरेगाव (पुणे) येथे उमाजी नाईक यांच्या कुळात झाला.
सह्याद्रीच्या खोऱ्यात थिसुबाईच्या डोंगरात दौलतराव व त्यांचे साथीदार आणि मेजर डॅनियल यांच्यात चकमक झाली.
या चकमकीत दौलतराव मारले गेले.
३. चतुरसिंह नाईक (Chatursinh Naik)
चतुरसिंह नाईक हे सातारा जिल्ह्यातील रामोशांचे नेते होते.
त्यांच्या नेतृत्वाखाली सातारा, वाई, भोर व कोल्हापूर येथे इंग्रजांविरुद्ध उठाव झाला.
लुटालूट करून तो पैसे त्यांनी गोरगरिबांमध्ये वाटला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा