MPSC Student Protest Pune : पुण्यात एमपीएससीचे परीक्षार्थी रस्त्यावर, शास्त्री रोडवर मोठ्या संख्येनं आंदोलन 2 January 2026

MPSC Student Protest Pune : पुण्यात एमपीएससीचे परीक्षार्थी रस्त्यावर, शास्त्री रोडवर मोठ्या संख्येनं आंदोलन

महाराष्ट्रात पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप या मागणीवर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली असून अनेक ठिकाणी या मुद्द्यावर आंदोलन पेटले आहे.

पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन

गुरुवारी रात्री उशिरा पुण्यातील शास्त्री रोड परिसरात शेकडो स्पर्धा परिक्षार्थींनी रस्त्यावर उतरत जोरदार आंदोलन केले. वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.

राजकीय नेत्यांचा निषेध आणि समर्थन

या घटनेनंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सरकारकडे वयोमर्यादा वाढीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी केली आहे.


MPSC संबंधी बातम्या असलेल्या पोस्ट वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:
1.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२४ राज्यसेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, रोहित पवार, तसेच काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ यांनी सोशल मीडियावरून सरकारवर टीका केली आहे.
रोहित पवार यांनी ‘एक्स’वर लिहिले:
“वय वाढीच्या निर्णयाबाबत सरकारने गेले आठ दहा दिवस विद्यार्थ्याना अंधारात ठेवले परिणामी नाईलाजाने आज विद्यार्थ्याना आंदोलन करावे लागत आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केसेस नोंदवल्या जात असल्याची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर बोललो असून विद्यार्थ्यांवर केसेस होऊन त्यांच्या भविष्यावर परिणाम होणार नाही यादृष्टीने पोलीस यंत्रणांनी विचार करण्याची विनंती केली. पोलीस प्रशासन विद्यार्थ्यांना सहकार्य करेल, ही अपेक्षा!”
हर्षवर्धन सकपाळ यांनी लिहिले:
“सरकार ठिकाणावर आहे का? हो आहे पण ते फक्त न्याय्य मागण्या दडपण्यासाठी, विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी. PSI पदासाठीची जाहिरात ७ महिने उशिराने आल्यामुळे हजारो विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र ठरले. ही चूक सरकारचीच मात्र यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही वयोमर्यादा एक वर्षाने वाढविण्याची मागणी करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकरवी सरकार दडपशाही करीत आहे.”

बच्चू कडूंचा इशारा: विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सामील होईन

MPSC Student Protest Pune: याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. काल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आंदोलकांचे फोटो शेअर करत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे.

बच्चू कडू यांनी पोस्टमध्ये म्हटले:
“MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल. DCP रावळे सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे.”

बच्चू कडूंच्या या पोस्टमुळे आंदोलनाला आणखी वेग मिळण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांची भूमिका आणि संभ्रम

विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्याने मागणी करूनही राज्य सरकारकडून अद्याप मुदतवाढीचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच एमपीएससीने परीक्षेचे प्रवेशपत्र, परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे वयोमर्यादा वाढणार की नाही, याबाबत अनेक उमेदवारांमध्ये संभ्रम आहे.

एका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्याने सांगितले:
“विद्यार्थ्यांवर हा खूप मोठा अन्याय होतोय. फक्त पीएसआयचा हा मुद्दा नाही. या पाठीमागे बरेच कारणे आहेत. प्रशासन आणि एमपीएससीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आज हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आहे. कित्येक आमदार आणि खासदारांनी पत्र पाठवले तरी मुख्यमंत्री दखल घेत नाहीत.”
दुसऱ्या विद्यार्थ्याने सांगितले:
“गेल्या शुक्रवारपासून ही गोष्टीची चर्चा सुरू आहे. सोमवारी नोटीफिकेशन येईल यासाठी शनिवार-रविवार पोरांनी वाट पाहिली. मागच्या ८-९ दिवसांपासून हे सुरू आहे. खासदारांनी पत्र पाठवली, शरद पवारांचा फोन झाला, एवढं सगळं होत असून देखील तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर हा प्रशासनावर प्रश्न आहे.”

नेमकी मागणी काय आहे?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ४ जानेवारीला महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र जाहिरात २९ जुलै २०२५ ला प्रसिद्ध झाली आहे. त्यात वय मर्यादा गणना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ अशी आहे.

जाहिरात येण्यासाठी सात महिने उशीर झाला. त्यामुळे अनेक उमेदवार अपात्र ठरून संधी हिरावली जाणार असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षा उमेदवारांनी वयोमर्यादा वाढवण्याची, वयोमर्यादा गणना करण्याचा कालावधी १ जानेवारी २०२५ गृहित धरण्याची मागणी केली जात आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

यशोगाथा (Success Story) - संतोष खाडे (पोलीस उपअधीक्षक/ DySP)

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs July 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी

Daily Current Affairs August 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs May 2025- चालू घडामोडी

Daily Current Affairs June 2025 - चालू घडामोडी